देवळा : वाजगाव ता. देवळा येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील भुमीकन्या अरुंधती भाऊसाहेब देवरे हिची नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागात नगररचना सहायकपदी निवड झाली आहे.
अरुंधती देवरे हिचे प्राथमिक शिक्षण देवळा येथील शारदादेवी ज्ञान विकास मंदिर शाळेत तर पाचवी ते दहावी चे शिक्षण देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयात झाले. पुढील उच्च माध्यमिक अकरावी ते बारावी नाशिक येथील के टी एच एम कॉलेज मध्ये घेऊन पुढे तिने छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात बीटेकच्या (सीव्हील इंजिनियरिंग) पदवीत विशेष प्राविण्य मिळवत नामांतिक कंपनीत कँम्पस सिलेक्शन झाले होते.
त्यानंतर अरुंधतीला संगमनेर जिल्ह्यात जि. प. च्या बांधकाम विभागात नोकरी मिळाली.नोकरी करत असतांना तिने महाराष्ट्र शासन नगर रचना विभागाच्या लेखी परीक्षेत पहील्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश संपादन करीत सहायक नगररचना अधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर अरुंधतीने हे यश संपादन केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. कामावर रुजु होण्यापूर्वी तीच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत तीच्या भावी वाटचालीसाठी जि प चे माजी सभापती शैलेश पवार , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव , भउर येथील डॉ . जे. डी. पवार विकास सोसायटी चेअरमन दिपक पवार , एलआयसीचे मुख्य सल्लागार केदा पवार , देवळा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सोमनाथ जगताप , विलास पवार, शिवा दादा , वैजनाथ पगार आदींनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले . ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेऊन देवरे हिने अल्पावधीत उच्चपदावर शिखर गाठल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.