सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १५ गुन्ह्यातील जप्त केलेला ४२ लाख ३६ रुपयाचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी तसेच मुळ तक्रारदार यांना परत देण्यात आला. उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या हस्ते परत करण्यात आला. यात सात दुचाकी, सोने चांदीचे दागिने, आदी वस्तू न्यायालयाच्या आदेशाने परत करण्यात आले यावेळी तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले
सदरची कामगीरीमध्ये अंबड पोलीस ठाणेचे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर ,योगेश देसले ,राहुल जगझाप ,वैभव वेखंडे, सचिन करंजे ,मयूर पवार ,समाधान शिंदे ,केशव ढगे, सागर जाधव, प्रवीण राठोड ,संदीप भुरे , मुद्देमाल कारकुन पो हवा, छबु सानप, अनिल गोसावी, यांनी केली . सिडको : अंबड पोलिस ठाणे येथे मुळ मालकांना माल परत करतांना किशोर काळे समवेत सचिन बारी . जग्वेद्रसिंग राजपूत, सचिन खैरनार आदी