नाशिक

नाशिक: ग्रामीण पाठोपाठ शहरातील नागरिकही पाणीटंचाईने त्रस्त

अंजली राऊत

इंदिरानगर, आनंदनगर भागात पाणीसमस्येने रहिवासी बेजार

इंदिरानगर, नाशिक : पुढारी वृत्तसेवा – प्रभाग क्रमांक 31 मधील आनंदनगर व परिसरात मनपा पाणीपुरवठा विभागाकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील रहिवाशी,महिला बेजार झाले आहेत. याबाबतीमध्ये मनपा पाणीपुरवठा विभाग, विभागीय अधिकारी, मुख्य उपअभियंता, उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले असून सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास दहा-पंधरा दिवसात नवीन नाशिक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आनंदनगर व परिसरामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा ,काही ठिकाणी पाणीच येत नाही तर काही ठिकाणी नळांना भक्त हवाच येत असल्याच्या बाबी रहिवाशांनी निदर्शनास आणून दिले आहेत ,त्यातच भारीच भर म्हणून या ठिकाणाहून गेलेल्या गॅस पाईप लाईनच्या खोदकामामुळे झालेली माती व खडे हे पाईप लाईन मध्ये गेल्याची शंका रहिवाशांनी उपस्थित केली असून त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाले असल्याची ही शंका उपस्थित केली आहे. उन्हाची तीव्रता वाढली असून त्यातच रहिवाशांना पाणी मिळत नसल्याने महिला वर्ग त्रस्त झाला आहे. मागील दोन-तीन महिन्यापासून परिसरात पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत असून परिसरातील रहिवाशांनी यासंबंधी निवेदने दिली आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील महिलांनी रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. श्री गणेश कृपा ,श्री गणेशा ,,द्वारकेस रेसिडेन्सी, शिवगंगा आपारमेंट ,शिवगंगा अव्हेनू ए,बी, शिवगंगा ,ओम शांती , कृष्णा सुमन, गोकुळ पॅलेस व इतर सोसायटीमध्ये पाण्याची कमतरता जाणवत आहे. य सोसायटीमधील रहिवाशांना टँकरद्वारे आर्थिक बोजा सहन करून पाणी मागवून समस्या सोडवावी लागत आहे .येत्या दहा-पंधरा दिवसात हा प्रश्ना न सुटल्यास नवीन नाशिक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा चेतन फेगडे व येथील रहिवाशांनी दिला आहे.

पाण्याची समस्या नेहमीच झाली आहे. परंतु पाणीपुरवठा विभागाचे अजिबात लक्ष नाही. पैसे देऊन पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागतात. पाणी बिल भरण्याचा काही उपयोग होत नाही. याला सर्वस्वी पाणीपुरवठा विभाग जबाबदार आहे. वेळीच दखल घ्यावी. – सचिन बोरसे ,ओमशांती अपार्टमेंट, रहिवाशी.

SCROLL FOR NEXT