पोलीस भरती  file photo
नाशिक

Nashik : पोलिस भरतीसाठी येताना तरुणाचा अपघाती मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक पोलिस दलातील शिपाई पदाच्या रिक्त जागांसाठी सुरु असलेल्या मैदानाची चाचणीसाठी येत असलेल्या युवकासोबतचा मित्र ट्रकच्या धडकेने मृत्यूमुखी पडला. कुणाल रामदास चरमळ (२२, रा. करंजी, ता. कोपरगाव) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

कुणाल चरमळ हा दुचाकीवरुन सोमवारी (दि.२४) पहाटे पाच वाजता मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या दिशेने दुचाकीवरून मित्रासोबत येत होता. नांदूर नाका सिग्नलजवळ त्यांच्या दुचाकीस आयशरने धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरुन खाली पडून कुणाल गंभीर जखमी झाला. त्याला धीरज अरुण गायकवाड यांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी कुणाल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली. अंगावर खाकी घालण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मित्रासोबत आलेल्या कुणालचा अपघाती मृत्यू झाल्याने झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी फरार झालेल्या वाहनचालकाचा आडगाव पोलिस शोध घेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT