इगतपुरी (नाशिक) : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर उद्घाटनाच्या तिसऱ्याच दिवशी शनिवारी (दि. ७) रात्री ८ च्या सुमारास इगतपुरी येथील बोगद्यात कारने कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले.
या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. महामार्ग पोलिसांनी तत्काळ धाव घेत रुग्णवाहिकेद्वारे जखमींना उपचारासाठी हलविले. विशेष म्हणजे याच दिवशी इतरही दोन ते तीन वाहनांचे अपघात झाल्याची माहिती आहे. मात्र, समृद्धी टोलनाका प्रशासन व इतर यंत्रणांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याच दिवशी माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने दि. ७ रोजी नक्की किती अपघात झाले याची माहिती मिळू शकली नाही.