ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तिघे ठार  Pudhari File Photo
नाशिक

Nashik Accident | ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तिघे ठार

पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी : नाशिक- पेठ मार्गावरील पेठ शहरानजीकच्या शिवमल्हार ढाब्याजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात समोरा-समाेर झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेठकडून करंजाळीकडे जात असलेल्या दुचाकीला ट्रक (एम.एच. २८ बी.बी. ०१०७) ची जोरदार धडक बसली. दुचाकीवरुन लहू सुदान लिलके (१६), कमलाकर पानडगळे (२५), योगेश पानडगळे (१९), सागर पानडगळे सर्व (रा. भायगाव, ता. पेठ) चालले असताना रात्री ११ च्या सुमारास अंधारात त्यांच्या दुचाकीची ट्रकला धडक बसली. यात लहू लिलके, कमलाकर पानडगळे, योगेश पानडगळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सागर पानडगळे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी सुदाम लिलके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रक चालक मोहम्मद गौस अब्दूल जबरसाठ (कर्नाटक) याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास प्रभारी पोलीस अधिकारी दुरगुडे, पोलीस हवालदार डी. आर. पानडगळे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT