मनमाड : दहेगाव शिवारात उलटलेली महामंडळाची बस.  Pudhari Photo
नाशिक

Nashik Accident | चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली, 10 प्रवासी जखमी

पुढारी वृत्तसेवा

मनमाड : शहरापासून जवळ असलेल्या दहेगाव शिवारात धावती बस उलटल्याने झालेल्या अपघातात आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत वृत्त असे, पुणे - दोंडाईचा ही बस (एमएच१४, बीटी २३७१) सुमारे ३५ प्रवाशांना घेऊन दोंडाईचाकडे जात होती. मनमाड बसस्थानक सोडल्यानंतर पुणे-इंदूर महामार्गावर दहेगाव शिवारात तिला अपघात झाला. भरधाव बस उलटल्याने प्रवाशांनी एकच आक्रोश केला. परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना मिळेल त्या वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातात चैतन्य मनोज शर्मा (रा. नंदुरबार), शिवाजी गोरख पाटील (अमळनेर), शोभा रमेश भोई, मीना मदनलाल पुराविया (अहमदनगर), मीनाबाई पाटील (अमळनेर) यांच्यासह इतर काही प्रवासी जखमी झाले आहेत. चालक वेगाने बस चालवत होता. यातच त्याचे नियंत्रण सुटून अपघात घडल्याची प्रवाशांमध्ये चर्चा होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT