नाशिक

Deola News: देवळा परिसरात एसटी बसचा भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी

Nashik accident news | या भीषण अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे

पुढारी वृत्तसेवा

देवळा : तालुक्यातील उमराणे शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर बुधवारी (दि.13) सकाळी साडे आठच्या सुमारास एसटी महामंडळाच्या शहादा डेपोच्या बसचा झाडावर आदळून भीषण अपघात झाला. यात चालकास सात ते आठ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी (दि.१३) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर शहादा डेपोची पुणे शहादा बस मालेगांवच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. दरम्यान उमराणे शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस क्रमांक (एम एच 14 एम एच 2310) महामार्ग लगत असलेल्या गुलमोहराच्या झाडावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात बसचा चक्काचूर झाला असून बसमधील प्रवाशांमध्ये किंकाळ्या सुरू झाल्या.

बसमध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. यात चालकासह सात ते आठ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही प्रवाशांना गंभीर मार लागल्याचेही सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

प्रवाशांच्या जीवाशी खेळ

ग्रामीण भागातील नागरिक आजही एसटीवर अवलंबून आहेत, मात्र महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याचा आरोप होत आहे. हा अपघात आहे की चालकाचा निष्काळजीपणा असे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT