कसारा घाटात ट्रक उलटला  Pudhari
नाशिक

Nashik Accident | कसारा घाटात ट्रक उलटून एक ठार

एक जण गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी : नाशिक- मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात ट्रक उलटा होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि.३१) पहाटे सहाच्या सुमारास घडली. ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटा हाेत फरफटत गेला. यात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.

ट्रक उलटा झाल्याने ट्रकमध्ये अडकलेल्या गंभीर व्यक्तीला दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर महामार्ग सुरक्षापथकाने काढून उपचारासाठी कसारा ग्रामीण रुग्णालयात हलविले. सहायक पोलिस निरीक्षक राम होंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने याकामी मदतकार्य राबविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT