अपघात File Photo
नाशिक

Nashik Accident News | वणी - नाशिक मार्गावर अपघात एक ठार

पुढारी वृत्तसेवा

वणी : वणी - नाशिक मार्गावर कृष्णगाव शिवारात दुचाकी व आयशर गाडीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णगाव शिवारात वणी- दिंडोरी रोडवर बुधवारी (दि. २) आयशर (केए१३ डि ५५८४) जात असताना अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून येणारी दुचाकी (एमएच१५ जेजे २९२४) आयशरवर धडकली. यात दुचाकीस्वार युवराज रवींद्र पवार (४०, रा. वऱ्हाणे, ता. मालेगाव) यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दीप्ती युवराज पवार (३८, रा. गौळाणे रोड, पाथर्डी, नाशिक) यांनी फिर्याद दिल्याने वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT