मालेगाव : सोयगाव मराठी शाळेजवळ 'हिट अॅण्ड रन'ची घटना घडली आहे. पतंग उडविणार्या आठवर्षीय बालकाला भरधाव अज्ञात कारने धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १२) घडली. आदित्य ब्रिजलाल पाल असे या बालकाचे नाव आहे. आदित्य हा रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पतंग उडवत असताना मराठी शाळेजवळील सोयगाव डीके चौक रस्त्यावर आला. याच दरम्यान टेहरेकडून डीकेकडे भरधाव वेगात जाणार्या अज्ञात कारने त्याला धडक दिली. यात आदित्यचा जागीच मृत्यू झाला.
दुपारच्या सुमारास रस्त्यावर वर्दळ नसल्याचा फायदा घेत अज्ञात वाहनचालक वाहन न थांबवता पसार झाला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यापूर्वीदेखील या रस्त्यावर १७ वर्षीय तरुणीचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर एका तरुणीला आपला पाय गमवावा लागला आहे.