व्दारका: पुढारी वृत्तसेवा- काल पहाटे पाच वाजेच्या दरम्यान द्वारका परिसरातील नंदिनी पुलावर कारला वाचवण्याच्या प्रयत्नात MH 04 JU 7927 नंबरचा नाशिक रोड कडे जाणारा कंटेनर नंदिनी पुलावर उलटला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. चालक देखील सुखरूप बचावला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर रहदरी नसल्याने मोठा अनर्थ टळला. रहधारीचा मुख्य रस्ता असल्याने सकाळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.