Nashik Accident
सापुतारा घाटात बस कोसळली; दोन मुलांचा मृत्यू Pudhari Photo
नाशिक

Nashik Accident | सापुतारा घाटात बस कोसळली; दोन मुलांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

सुरगाणा : गुजरातमधील सापुतारा घाटात पर्यटकांची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघाात दोन मुलांचा मृत्यू झाला. या अपघातावेळी बसमध्ये 60 ते 70 प्रवाशी होते. मात्र, इतर प्रवाशांना वाचविण्यात पोलिस प्रशासनाला यश आले आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज असून अपघातात व्हिडोओ व्हायरल झाल्याने अपघाताची भिषणता समोर आली आहे.

गुजरातमधील सापुतारा घाटात रविवारी (दि.7) सायंकाळच्या सुमारास पर्यटकांची बस दरीत कोसळली. या अपघातात ५ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताचा एका प्रवाशाने केलेला व्हिडीओ व्हायरल मंगळवारी (दि.9) रोजी व्हायरल झाल्याने अपघाताची भीषणता समोर आली आहे. पर्यटकांची ही बस रविवारी पहाटे सूरत चौक बाजारातून सापुतारा येथे पर्यटकांना घेऊन गेली होती. त्यानंतर सांयकाळच्या सुमारास परतत असताना सापुतारा- मालेगाम राष्ट्रीय महामार्गाच्या घाटावरून ही बस दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

SCROLL FOR NEXT