नाशिक

नाशिक : साक्रीमध्ये पुलावरून चारचाकी कोसळली; मामा-भाची जागीच ठार

backup backup

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : साक्रीनजीक असलेल्या शेवाळी रस्त्यावरील पुलावरुन चारचाकी कोसळल्याने मामा-भाची जागीच ठार झाल्याची घटना आज (दि. ९) सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात एक महिला जखमी झाली असून त्यांच्यावर साक्री रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील अंबोडे येथील सुभाष रुपला बागुल (वय ४०) हे आज (दि. ९) सकाळी पत्नी भारती बागुल (वय ३८) व भाची मोहीनी (चिऊ) पांडूरंग साबळे (वय ३, रा.कुडाश) हिच्यासह चारचाकीने (एमएच 18/ एएल 9528) या वाहनाने अंबोडेहून धुळ्याकडे निघाले होते. धुळ्यात त्यांची दोन्ही मुले हॉस्टेलला राहतात. पोळ्याची सुटी असल्याने ते मुलांना आपल्या गावी नेण्यासाठी ते धुळ्याकडे निघाले होते. आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेवाळी रस्त्यावर हॉटेल उदय पॅलेस जवळील पुलावरुन जात असताना त्यांचे वाहन पुलावरून खाली कोसळले.

या अपघातात सुभाष बागुल हे जागीच ठार झाले, तर पत्नी भारती व भाची जखमी झाल्याने त्यांना धुळ्यातील हिरे रुग्णालयात हलविण्यात आले. परंतू भाची मोहिनी हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर भारती यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस ठाण्याचे पीआय मोतीराम निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. साक्री पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT