गहू निर्यात file photo
नाशिक

पुढारी विशेष : गहू निर्यातीत ९५ टक्के घट ; लोकसभा निवडणुकीचा फटका

चालू वर्षी अवघी ४७० कोटींची निर्यात; कमी उत्पादनासह लोकसभा निवडणुकीचा फटका

पुढारी वृत्तसेवा
लासलगाव : राकेश बोरा

रशिया व युक्रेन युद्धानंतर जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय गव्हाला प्रचंड मागणी वाढली होती. २०२१ - २२ या आर्थिक वर्षामध्ये भारताने जगातील ७१ देशांना ७२ लाख ३९ हजार टन गहू निर्यात केला होता. या निर्यातीतून १५,८४० कोटींचे परकीय चलन मिळाले होते. २०२२- २३ या वर्षात पुन्हा निर्यात घटण्यास सुरुवात झाली. २०२३- २४ या आर्थिक वर्षात देशातील घटलेले उत्पादन व लोकसभा निवडणूक यामुळे गहू निर्यात बंद केली. त्यामुळे एका वर्षात ९६ टक्के निर्यात कमी झाली.

2023-24 या वर्षात १२ देशांना फक्त १,८८,२८८ टन निर्यात झाली व उलाढाल ४७० कोटींवर आली. या आर्थिक वर्षामध्येही निर्यातीऐवजी गहू आयात वाढवावी लागत आहे.

निर्यात (कोटींमध्ये)

  • 2019-20 : 439

  • 2020-21: 4,037

  • 2021-22 : 1,580

  • 2022-23 : 11,826

  • 2023-24 : 470

निर्यात टन

  • 2019-20 : 2,17,354

  • 2020-21 : 20,88,487

  • 2021-22 : 72,39,366

  • 2022-23 : 46,93,264

  • 2023-24 : 1,88,288

निर्यात घटण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी लोकसभा निवडणूक आहे. देशांतर्गत गव्हाचे भाव कमी राहावे याकरता केलेली निर्यातबंदी तसेच दुष्काळ आणि इतर कारणांमुळे गव्हाचे उत्पादन घटले आहे. तीन वर्षांपूर्वी रशिया- युक्रेन युद्धानंतर जगभरात गव्हाची मागणी वाढली होती मात्र आपण उत्पादन वाढवण्यात अपयशी ठरलो.
सचिन आत्माराम होळकर, कृषितज्ज्ञ, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT