नाशिक : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही काही दिवसांपासून सततच्या दौऱ्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे. राज्यात उन्हाचा पारा हा तीव्र झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उन्हाचा चटका बसत आहे. मात्र, मंत्री झिरवाळ यांना नेमके काय झाले आहे, याची माहिती मिळू शकली नाही.
मुंबईतील सौफी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून, त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. पुढील काही दिवस त्यांना विश्रांतीची गरज आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. मंत्री झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभेचे आमदार आहेत. ते आदिवासी बहुल भागातील जनतेचे प्रतिनिधित्व करतात.