Narhari Zirwal Pudhari News network
नाशिक

Narhari Zirwal | सरपंच ते आमदारकीची लॉटरी आता मंत्रिपदाची घेणार शपथ

Maharashtra Cabinet expansion today: नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन आला

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - नरहरी झिरवाळ हे दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवाळ 2009 साली अवघ्या 149 मतांनी पराभूत झाले होते. त्यानंतर मात्र सलग तीन वेळा आमदार झाले आहेत. 2024 मध्ये नाशिक जिल्ह्यात 7 राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांपैकी फक्त नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नरहरी झिरवाळ शपथ घेणार हे आता निश्चित झालेले आहे.

वनारे गावचे सरपंच ते मंत्री असा नरहरी झिरवाळ यांचा प्रवास राहिला आहे. ग्रामीण भागातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नरहळी झिरवाळ यांनी विविध कार्यकारी संस्थांचे संचालक, चेअरमन पदे भुषवली आहेत .

नरहरी झिरवाळ यांचीच्या राजकीय कारकीर्दीवर एक नजर (Narhari Zirwal Profile )

  • 1984 - सरपंच, वनारे गाव.. वनारे विविध कार्यकारी संस्थेचे संचालक, चेअरमन

  • 1995 - दिंडोरी विधानसभा पोटनिवडणुकीत जनता दलकडून विधानसभा निवडणूक, पराभूत

  • 1997 - जनता दलाकडून पंचायत समिती सदस्य, उपसभापती.. कोशिंबे पंचायत समिती गण

  • 1999 - पासून दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष

  • 2002 - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य, कोशिंबे गट

  • 2004 - आमदार, दिंडोरी विधानसभा

  • 2009 - दिंडोरी लोकसभा निवडणूकीत पराभव राष्ट्रवादी गट

  • 2009 - विधानसभा 149 मतांनी निसटता पराभव, राष्ट्रवादी गट

  • 2014, 2019, 2024 - सलग तीन वेळा आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT