झिरवाळ दादांसोबतच; महायुतीची उमेदवारी त्यांनाच : प्रदेशाध्यक्ष तटकरे File Photo
नाशिक

झिरवाळ दादांसोबतच; महायुतीची उमेदवारी त्यांनाच : प्रदेशाध्यक्ष तटकरे

पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी(जि. नाशिक) : आगामी विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवाळ हेच महायुतीचे उमेदवार राहतील, त्यांच्याबाबत सुरू असलेल्या इतर चर्चा निरर्थक असून ते अजित पवार यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी झिरवाळ यांची उमेदवारी जाहीर केली. येथील आदिवासी सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित जनसन्मान यात्रेत ते बोलत होते.

तटकरे म्हणाले, महायुती शासनाने एक लाख हजार कोटी रुपयांच्या योजना राबविल्या असून, शेतकर्‍यांच्या कृषिपंपाचे वीजबिल सरसकट माफ करण्याचा निर्णय घेऊन शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. राज्यातील सर्वच घटकांसाठी सरकार काम करत आहे.

तटकरे म्हणाले, महायुती शासनाने एक लाख हजार कोटी रुपयांच्या योजना राबविल्या असून, शेतकर्‍यांच्या कृषिपंपाचे वीजबिल सरसकट माफ करण्याचा निर्णय घेऊन शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. राज्यातील सर्वच घटकांसाठी सरकार काम करत आहे.

तो माझ्या शब्दाबाहेर नाही : झिरवाळ

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे सुपुत्र गोकुळ यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून खासदारकी लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आढावा बैठकीस उपस्थित राहात दिंडोरी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत वडिलांना आव्हान देण्याची तयारी दर्शविली होती. त्यावर माध्यमांनी झिरवाळ यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी सांगितले की, मी गोकुळचा बाप आहे, तो माझ्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT