नाशिक : वन्यजीव सप्ताहानिमित्त उपस्थित वन विभागाचे अधिकारी तथा कर्मचारी. Pudhari News Network
नाशिक

Nandur madhyameshwar : नांदुरमध्यमेश्वरमध्ये 11 हजार पक्ष्यांचा किलबिलाट

एकूण सात ठिकाणी करण्यात आले पक्षीनिरिक्षण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : रामसर दर्जा प्राप्त नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात तब्बल ११ हजार पक्षांचा किलबिलाट असल्याचे गणनेअंती समोर आले आहे. वन विभागाच्यावतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त पक्षी गणना घेण्यात आली. नांदुरमध्यमेश्वर गोदावरी नदीपात्र, कोठुरे, कुरुडगाव, काथरगांव यांसह एकुण सात ठिकाणी केलेल्या पक्षीनिरिक्षणात ११ हजार पक्ष्यांची नोंद करण्यात आली.

यामध्ये ९ हजार २५३ पाणथळ पक्षी, तर १९२३ गवताळ भागातील पक्षी बघावयास मिळाले. यात स्थलांतरित ब्ल्यू चीक बीइटर, वॉटरकॉक, मार्श हेरीअर या पक्ष्यांचे दर्शन झाले. तसेच काळा, पिवळा आणि लाल तपस हे तीन प्रकारचे पक्षीदेखील बघावयास मिळाले. पावसाळ्यात अभयारण्यात हळदीकुंकू, वारकरी, सूर्यपक्षी, जांभळी पानकोंबडी, राखी बगळा, तांबट, राखीधनेश, मुनिया, स्टोनचाट, उघड्या चोचीचा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, स्पुनबिल, शेकाेट्या, नदीसुरय आदी पक्षी आढळून आले आहेत. हिवाळ्यात या परिसरात देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. ३१० पेक्षा अधिक जातींचे पक्षी या ठिकाणी बघावयास मिळतात. तसेच ६५ जातीचे मासे आणि ५०० पेक्षा जास्त वनस्पती देखील या अभयारण्यात आहेत. अभयारण्याच्या विविध पक्षी निरीक्षण मचाणवरून पक्षीमित्रांच्या सहकार्याने पक्षीगणना करण्यात आली.

पक्षीगणनेत यांचा सहभाग

सहाय्यक वनसंरक्षक हेमंत उबाळे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, वनपाल रुपेश कुमार दुसाने, वनरक्षक जी. के. पाटील, के. डी. सदगीर, नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, पक्षिमित्र सतीश गोगटे, उमेशकुमार नागरे, अनंत सरोदे, वन कर्मचारी अमोल दराडे, गंगाधर आघाव, रोहीत मोगल, विकास गारे, रोशन पोटे, प्रमोद मोगल, संजीव गायकवाड, सुनील जाधव, गणेश वाघ, पंकज चव्हाण, प्रमोद दराडे, एकनाथ साळवे, अमोल डोंगरे आदी मान्यवर पक्षीगणनेत सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT