नाशिक

Wildlife Census 2026 | नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात प्राणी गणना

Nashik news | पौर्णिमेच्या प्रकाशात १५ वन्यजीवांची नोंद

पुढारी वृत्तसेवा

निफाड/नाशिक : महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आणि पक्षिप्रेमींचे नंदनवन असलेल्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात शुक्रवारी (दि. १) बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी निसर्ग अनुभव अर्थात प्राणी गणना उपवनसंरक्षक कृष्णा भवर आणि सहायक वनसंरक्षक हेमंत उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात विविध वन्यजीवांचे दर्शन झाल्याने विद्यार्थी, निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या गणनेसाठी सहभागी निसर्गप्रेमींना विनामूल्य प्रवेश देण्यात आला होता. ही प्राणी गणना शुक्रवारी (दि. १) सायंकाळी ५ वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. २) सकाळी ७ पर्यंत अखंड सुरू होती. पौर्णिमेच्या प्रकाशात मचाणांवर बसून वन्यजीवांच्या हालचालींची नोंद घेण्यात आली.

वन्यजीव संवर्धन आणि अभयारण्यातील जैवविविधतेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने ही प्राणी गणना महत्त्वाची ठरली आहे. निसर्गाच्या या सानिध्यात वन्यजीवांच्या अधिवासाची माहिती संकलित करण्यासाठी या मोहिमेला यश आले. वने व वन्यजीवांबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी व वन्यजीवांना जवळून बघता यावे, हा या मोहिमेचा उद्देश आहे, असे हिरालाल चौधरी यांनी सांगितले.

आढळलेले प्राणी

या मोहिमेदरम्यान एकूण १५ वन्यजीवांची नोंद करण्यात आली. यात सोनेरी कोल्हा ८, रानमांजर ३, तरस १, मुंगूस १, तर रानससे २ असे वन्यजीव आढळून आले.

सहभागी अधिकारी व निसर्गप्रेमी

या वन्यजीव गणनेत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, वनमजूर, गाइड आणि निसर्गप्रेमी पर्यटकांनी सहभाग घेतला. यात हिरालाल चौधरी (वनपरिक्षेत्र अधिकारी), गौरव रायते (परीक्षविधीन वनपरिक्षेत्र अधिकारी) वन कर्मचारी कैलास सदगीर, गोरख पाटील, निसर्गप्रेमी अनंत सरोदे, अझहर शेख, रेहान शेख, सारंग नाईक, गणेश ठाकूर, सीमा तंगडपल्लीवार, स्पंदन खैरनार, पद्मजा ओतूरकर, डॉ. कपिल वाघ, अमेय पुरोहित, हर्षल आहेरराव, सर्वेश शिंदे, दीपक कुटे, गंगाधर आधाव, एकनाथ साळवे, संजीव गायकवाड, सुनील जाधव, रोहित मोगल, रोशन पोटे, पंकज चव्हाण आणि अजित कुटे यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT