नाशिक

NAMCO Bank Election : नामको बॅंक निवडणूकीतील उमेदवारांना चिन्हाचे वाटप

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– दि नासिक मर्चंन्ट को. आॅप. बँकेच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना मंगळवारी (दि.१२) चिन्ह वाटप करण्यात आले. यामध्ये सत्ताधारी प्रगती पॅनलच्या उमेदवारांना 'जीप' चिन्ह मिळाले आहे. दरम्यान, प्रगती पॅनलने प्रचाराचा नारळ फोडला असून, प्रचाराच्या पहिल्याच दिवशी त्र्यंबकेश्वर, हरसूल, गिरणारे, पेठ याभागातील सभासदांच्या गाठीभेटी घेतल्या. तसेच सायंकाळी चोपडा लॉन्स येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन देखील केली. (NAMCO Bank Election)

साेमवारी (दि.११) अर्ज माघारीनंतर मंगळवारी चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली. यात सत्ताधारी गटाच्या उमेदवारांना, मागील निवडणूकीत त्यांचे असलेले व यंदाही पहिली पसंती दिलेले 'जीप' हे चिन्ह मिळाले. संदिप भवर यांना 'विमान', विजय बाेरा यांना 'पाकिट', महेंद्र गांगुर्डे यांना 'छत्री', अॅड.सुधाकर जाधव यांना 'कपबशी', संजय नेरकर यांना 'माेरपीस' आणि कपिलदेव शर्मा यांना 'तुळशी वृंदावन' हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. या निवडणूकीकरीता १ लाख ८८ हजारांवर मतदार असून, मतदारांपर्यंत पाेहाेचण्यासाठी तीनशेवर मतदान केंद्रांसाठी तयारी सुरू आहे. दरम्यान, प्रगती पॅनलविरुद्ध सात अपक्ष उमेदवार असा सामना रंगणार आहे.

निवडणूकीचा बँकेला फटका (NAMCO Bank Election)

अर्ज माघारीच्या दिवशी प्रतिस्पर्धी आणि प्रमुख पॅनलपैकी एक असलेल्या सहकार पॅनलच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध होईल, असे काही काळ चित्र निर्माण झाले होते. मात्र, सात अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेण्यास सपशेल नकार दर्शविल्याने, निवडणूक घेणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे बँकेच्या तिजोरीतून निवडणुकीचा संपूर्ण खर्च करावा लागणार आहे. बँकेचा सुरतपर्यंतचा विस्तार लक्षात घेता हा खर्च दीड कोटींपेक्षा अधिक असल्याचे बोलले जात आहे.

प्रगतीच्या प्रचारात सहकारचे उमेदवार

प्रगती पॅनलने मंगळवारी सकाळी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर सायंकाळी प्रचार कार्यालयाचे उद‌्घाटन केले. यावेळी पॅनेलच्या सर्व उमेदवारांसह प्रमुख सभासद उपस्थित होते. यामध्ये सहकार पॅनलच्या पाच उमेदवारांचाही समावेश होता. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT