दिंडोरी (नाशिक) : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला सुरुवात करावी तसेच येत्या 10 तारखेला पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा होणार असून, या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवा नेते गोकुळ झिरवाळ यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे यांनी पुणे येथे होणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाची माहिती दिली. सर्व कार्यकर्त्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या. दिंडोरीपासून पूर्व भागातील कार्यकर्त्यांनी प्रवासाचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन यशस्वी करून अजित पवार व मंत्री नरहरी झिरवाळ यांचे हात बळकट करण्याचे आवाहन उफाडे यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश शिंदे, कादवा कारखान्याचे संचालक बाळासाहेब जाधव, ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, माजी सभापती सदाशिव शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास कड, माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस सुरेश कळमकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे, विष्णू संधान, माधवराव साळुंखे, विनोद देशमुख, नरेंद्र पेलमहाले, गोपीनाथ पाटील, एकनाथ गायकवाड, हिरामण गावित, संजय केदार, संजय मोरे, अजित कड, अतुल निगळ, सुनील बोरस्ते, अनिकेत बोरस्ते, डॉ. विजय गटकळ, प्रतीक जाधव, सचिन धुमणे, बापू तासकर, परीक्षित देशमुख आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.