Drug Case Pudhari File Photo
नाशिक

Mumbai Naka MD drugs case - मुंबई नाका परिसरामध्ये एमडी ड्रग्जविरोधात कारवाई, तिघांना अटक, ७.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई नाका परिसरामध्ये एमडी ड्रग्जविरोधात कारवाई, तिघांना अटक, ७.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मुंबई नाका परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाने भडक कारवाई करीत एमडी (मंफिॉन) या अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक केली. या कारवाईत सुमारे ७ लाख ३६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात एमडी ड्रग्ज, महागडे मोबाइल, रोकड आणि चारचाकी वाहनाचा समावेश आहे.

या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी अमली पदार्थाच्या किटचा सखोल तपास सुरू केला आहे. अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस अंमलदार चंद्रकांत प्रभाकर बागडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून झाकिर रफिक शेख (३८, रा. कथाडा, अमरधाम रोड, जुने नाशिक), शाहरूख युसूफ शेख (३०, रा. पंचशीलनगर, हटिल रॉयलजवळ, एन. डी. पटेल रोड) आणि सिराज सोहराय शेख (३१, रा. करतुत्यानगर, होलाराम कॉलनीसमोर, शरणपूर रोड) यांना अटक करण्यात आली. तिघांनाही शनिवारी (दि. १६) पहाटे सुमारे २.५२ च्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले.

शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी ६ च्या सुमारास महाराष्ट्र फूड्स चहा दुकानासमोर, गारवा बिर्याणीजवळ, मुंबई नाका परिसरात आरोपी एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी थांबले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अफरोज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रयत कारवाई केली. यावेळी आरोपी झाकिर शेखाकडून सुमारे ८ ग्रॅम वजनाचा ४० हजार रुपये किमतीचा मॅफेड्रॉन (एमडी) अमली पदार्थ जस करण्यात आला,

तपासादरम्यान आरोपींकडून विविध कंपन्यांचे महागडे मोबाइल फोन, रोकड तसेच अंदाजे ५ लाख रुपये किमतीची सिल्व्हर रंगाची स्कोडा सेडान कार (एमएच ४६, एक्य ४५९५) जप्त करण्यात आली, पोलिसांनी आरोपींकडून सॅमसंग गॅलेक्सी एफ १५, आयफोन ११, मॉडिफाईड आयफोन तसेच संमसंग गॅलेक्सी झोड फोल्ड ५ यांसारखे माहागडे मोबाइल जत केले. या मोबाइलच्या फरिन्सिक तपासातून अमली पदार्थपुरवठा साखळी, व्यवहार आणि संपर्कातील इतर संशयितांची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा अमली पदार्थ मालेगाव येथील हसन नावाच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, अमली पदार्थ पुरवठ्याचे जाळे किती मोठे आहे आणि शहरात यापूर्वीही अप्ताच प्रकारे विक्री केली होती का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपीना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पोलिस कोठडीदरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT