Kiran Changdev Narode File Photo
नाशिक

Nashik hit and run: गणरायाच्या आगमनाचा आनंद क्षणात मावळला! मुंबई नाक्यावर हिट अँड रन, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

नाशिकच्या मुंबईनाका परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने ३३ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Nashik hit and run:

नाशिक: नाशिकच्या मुंबईनाका परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने ३३ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाला. किरण चांगदेव नरोडे असे मृत तरुणाचे नाव असून, अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला आहे.

गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी कंपनीत आलेल्या किरणचा अंबडहून मुंबईनाक्याकडे येताना अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पसार ट्रकचा शोध सुरू आहे. गणेशोत्सवाच्या आनंदात असलेल्या नरोडे कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?

सिंहस्थासाठी शहरभर रस्ते खोदले, पाइप टाकले; पण नागरिकांच्या जिवाची सुरक्षा मात्र महापालिकेच्या विकास आराखड्यातच नाही का? रस्त्याच्या मध्योमध काळे पाइप टाकूनही साधा सूचनाफलक, रिफ्लेक्टर किंवा सुरक्षिततेची व्यवस्था न करण्याच्या कथित निष्काळजीपणाचा फटका सिद्धार्थ गोरे या तरुणाला बसला.

अंधारात हे पाइप न दिसल्याने दुचाकी त्यावर आदळली अन् सिद्धार्थचा जीव गेला. मागे राहिल्या सहा महिन्यांची आणि दोन वर्षांची दोन चिमुरड्या मुली... कर्त्या पुरुषाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला. अखेर त्यांनी पार्थिव थेट महापालिकेच्या दारात आणून ठेवले.

'आता तरी जागे व्हा; आमचा संसार उद्ध्वस्त झाला, दुसऱ्याचा होऊ देऊ नका!' या टाहोने महापालिका प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावरच घणाघाती प्रश्नचिन्ह उभे केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे जाणाऱ्या बळींचा सिलसिला सुरूच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT