मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंडांचा निधी दहा लाख कोटींवर  pudhari photo
नाशिक

Multi asset allocation funds : मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंडांचा निधी दहा लाख कोटींवर

सध्याच्या अनिश्चित वातावरणात इक्विटी, सोने, रोखेसारख्या मालमत्तांत अतिशय गतिमान गुंतवणूक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जगभरातील शेअर बाजारात तीव्र चढउतार सुरू असले तरी ‘एसआयपी’च्या माध्यमातून भारतीय शेअर बाजाराकडे गुंतवणुकीचा प्रवाह कायम आहे. जून 2025 मध्ये, भारतातील मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंडातील एकूण निधी (एयूएम) तब्बल 9.9 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हा निधी दिवाळीत दहा लाख कोटींवर जाईल, असा अंदाज विविध म्युच्युअल फंडांच्या अहवालात नमूद करण्यात आला आहे.

प्रामुख्याने हायब्रिड श्रेणीत असलेल्या या फंडात मल्टी सेट, आर्बिट्राज, बॅफ आदी प्रकारच्या फंडाचा समावेश होतो. या फंडात जूनमध्ये एसआयपीच्या माध्यमातून 8243 कोटी रुपयांचा निधी गुंतविला गेला आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे या फंडात निधीचा ओघ काहीसा घटला असला तरी दिवाळीपर्यंत मासिक गुंतवणूक दहा हजार कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे. सध्याच्या गुंतागुंतीच्या ढोबळ आर्थिक परिस्थितीत इष्टतम जोखीमेवर आधारित परतावा प्रदान करण्यासाठी मल्टी अ‍ॅसेस्ट अ‍ॅलोकेशन फंड इक्विटी, सोने आणि रोख्यात गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम स्थितीत उभे आहेत.

दीर्घकाळात महागाईवर मात करण्याची क्षमता समभागांत असली तरी हायब्रिड फंड तुलनेने कमी घसरणीच्या जोखीमेमुळे इष्टतम जोखीमेवर आधारित परतावा प्रदान करू शकतात. भांडवल संरक्षण, पोर्टफोलिओ स्थिरतेला प्राधान्य देणार्‍या गुंतवणूकदारांसाठी हा फंड आकर्षक ताळमेळ साधतो. सध्याच्या परिस्थितीत मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंडासारखे हायब्रिड फंड हे गुंतवणुकीसाठी अनुकूल स्थितीत आहेत. हे फंड वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांच्या विशिष्ट जोखीम-परताव्याच्या वैशिष्ट्यांचा अतिशय चपखलपणे फायदा उठवत आहेत. समभाग, निश्चित उत्पन्न आणि कमोडिटीज यापैकी कोणत्याही क्षेत्रात गुंतवणुकीत बदल करण्याची या फंडाकडे असलेली लवचिकता त्यांना वाढीच्या उत्तम संधी प्रदान करतात.

सध्या मध्यवर्ती बँकांकडून सुरू असलेली खरेदी आणि जागतिक पातळीवर भू-राजकीय स्थितीबाबत घेतली जात असलेली कमालीची सावधानता आदी घटकांच्या पार्श्वभूमीमुळे सोने सध्याच्या अनिश्चित वातावरणात एक धोरणात्मक गुंतवणूक ठरली आहे.

कर्जरोखे, सोन्यावर भर

जेव्हा आर्थिक किंवा भू-राजकीय तणावामुळे शेअर बाजार घसरतो, तेव्हा कर्जरोखे (डेट) आणि सोन्यासारख्या इतर मालमत्ता वर्गांच्या मूल्यांत वाढ होऊ शकते. मल्टी अ‍ॅसेट लोकेशन फंड अस्थिर काळात या नकारात्मक सहसंबंध असलेल्या मालमत्तेची उसळी काबीज करण्यास अतिशय सक्षम आहेत. त्यामुळे नकारात्मक जोखीम कमी होते.

डेरिव्हेटिव्ह्जचा वापर

मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड्स विविध मालमत्ता वर्गांमध्ये त्यांच्या निधीची गुंतवणूक अतिशय गतिमानपणे करतात. हे फंड इक्विटी कर आकारणीसाठी पात्र असताना पोर्टफोलिओ अस्थिरता कमी करण्यासाठी डेरिव्हेटिव्हजचा वापर करून सुरक्षित पद्धतीने समभागांत गुंतवणूक करण्याबाबत अतिशय सक्षम आहेत.

दीर्घकालीन गुंतवणूक उद्दिष्टांसाठी कराचा बोजा कमी करण्यासाठी कार्यक्षम मार्ग शोधणारे गुंतवणूकदार मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंडांचा विचार करू शकतात. हे फंड दीर्घकालीन वाढीच्या क्षमतेचे फायदे, अल्पकाळातील घसरणीपासून संरक्षण आणि कर कार्यक्षमता हे एकत्रित करतात. त्यामुळे ते गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय ठरले आहेत.
राजसा के., उपाध्यक्ष आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापक - इमर्जिंग मार्केट्स इक्विटी-इंडिया, फ्रँकलिन टेम्पलटन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT