Majhi Ladki Bahin Yojana file photo
नाशिक

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | नाशिकमध्ये १६ तारखेला 'महिला सशक्तीकरण'

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये शुक्रवारी (दि. १६) महिला सशक्तीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) व अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. महायुतीच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघातून मेळाव्यासाठी लाभार्थी महिला आणावे, असे फर्मान सोडण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. (A women's empowerment meeting has been organized in Nashik to promote Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)

राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत महिलांना संघटीत करणे, प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिला संदर्भातील शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी करणे, सर्व शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी एकत्र येऊन योजनांचे लाभ हा लाभार्थी महिलांपर्यंत पोहचविणे हा त्यामागील उद्देश आहे. त्याअनुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यांमधून बचतगटातील तसेच शक्ती गटांतील महिलांना प्रशिक्षित केले जात आहे.

नाशिकमध्ये येत्या १६ तारखेला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटीमधील तपोवन मैदानावर हा मेळावा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री हे लाभार्थी महिलांशी संवाद साधणार आहेत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा प्रचार व प्रसारही या माध्यमातून करण्यात येणार आहे. मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्र्यांसह महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांच्यासह प्रमुख मंत्र्यांची उपस्थिती लाभणार आहे. मेळाव्यासाठी किमान ५० ते ६० हजार महिला लाभार्थींना आणण्याचे उदिष्टच देण्यात आले आहे. त्यात महायुतीच्या १३ आमदारांवर त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघातून लाभार्थी महिलांना गोळा करुन मेळाव्याच्या ठिकाणी आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विविध शासकीय यंत्रणांनादेखील त्यांच्या योजनांमधील लाभार्थी महिलांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यामुळे मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आमदार तसेच अधिकारी झाडून कामाला लागले आहेत.

विधानसभेची रंगीत तालिम

सप्टेंबर एंडीगला विधानसभा निवडणूका घोषित होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कमी कालावधीत राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी महायुतीमधील तीनही पक्षांची धडपड सुरू आहे. त्याअनुषंगाने महिला सशक्तीकरण मेळावा महत्वपूर्ण असणार आहे. हा मेळावा म्हणजे विधानसभेची रंगीत तालिम आहे. आपल्या तालुक्यातून थेट मेळाव्याच्या ठिकाणी लाभार्थी महिलांना आणण्यासाठी आमदारांना त्यांचे कसब पणाला लावावे लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT