MSRTC Smart Card Pudhari
नाशिक

MSRTC NCMC Smart Card | एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी! एनसीएमसी स्मार्ट कार्डची सक्ती टळली, 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

MSRTC NCMC Smart Card | 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ ; महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डची पूर्तता सध्या सक्तीची करण्यात आलेली नाही. प्रवाशांना हे कार्ड काढण्यासाठी दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महिला प्रवाशांसाठी एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलतीची योजना सुरूच असून, ज्येष्ठ नागरिकांना (६५ वर्षांवरील) १०० टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे.

या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एनसीएमसी स्मार्ट कार्ड माध्यमातून सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये एकाच कार्डचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भविष्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत डिजिटल आणि कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी या कार्डचा उपयोग होणार आहे.

मात्र, सध्या कार्डची पूर्तता करण्यासाठी प्रवाशांवर सक्ती केली नसल्यामुळे नियमित एसटी प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महामंडळाच्या माहितीनुसार, महिला प्रवाशांना लागू असलेली ५० टक्के सवलत आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठीची १०० टक्के सवलत कायम आहे.

त्यामुळे सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी एनसीएमसी कार्ड तातडीने काढणे आवश्यक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ असल्यामुळे प्रवाशांना कार्ड काढण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध झाला आहे. एनसीएमसी कार्डमुळे भविष्यात एसटीसह विविध सार्वजनिक वाहतूक सेवांचा वापर अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

एकाच स्मार्ट कार्डद्वारे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची संकल्पना या माध्यमातून पुढे नेली जात आहे. प्रवाशांचा वेळ वाचणे, व्यवहार सुलभ होणे आणि तिकीट व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणे, हे या प्रणालीचे प्रमुख उद्देश आहेत.

संपर्काचे आवाहन

एसटी महामंडळाकडून प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. एनसीएमसी कार्डसंदर्भातील अधिक माहिती महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. तसेच प्रवाशांना टोल फ्री क्रमांक १८०० २२ १२५० वर संपर्क साधून आवश्यक माहिती घेता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT