सिन्नर : केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून नाशिकमध्ये राम काल पथ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी 99.14 कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे नाशिकच्या पर्यटन क्षेत्राला बूस्टर मिळणार असल्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी म्हटले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांचे आभार व्यक्त केले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने खासदार वाजे यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे विकासकामे करण्यासाठी विविध मागण्यांचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविलेले आहेत. महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत मागणी केलेल्या विविध मागण्यांबाबतदेखील खासदार वाजे हे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी व्हावा तसेच जिल्ह्यात प्रकल्प उभे राहावेत यासाठी पहिल्या संसदीय अधिवेशनापासून खासदार वाजे यांचे प्रयत्न सुरू आहेत.
रामकाल पथ प्रकल्प ही सुरुवात आहे. आगामी काळात आणखी प्रकल्प नाशिक शहरात आणि जिल्ह्यात उभे राहतील, असा माझा प्रयत्न आहे. नाशिकच्या पर्यटन क्षेत्रात भर घालण्यासाठी राम-काळ पथ हा प्रकल्प बूस्टर ठरणार आहे.राजाभाऊ वाजे, खासदार,नाशिक