पुढारी ऑनलाइन डेस्क | नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी गंगापूररोडवरील एका कॅफेवर छापा टाकत कारवाई केली आहे. त्यावेळी कॅफेमध्ये सुरु असलेले प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. या ठिकाणी तरूण-तरूणींना १०० ते २०० रूपयात रूम दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या कॅफेत तरुण तरूणांसाठी पडदे लावून खास सोय केली जात असल्याची तक्रार आल्यानंतर आज (दि. 1) दुपारी आमदार देवयानी फरांदे यांनी विद्या विकास सर्कल जवळील हॉटेल मोगली कॅफे येथे पोलिसांना घेऊन धडक दिली. पोलिसांनी कॅफेमध्ये अनेक मुला मुलींना अश्लील चाळे करताना ताब्यात घेतले.
यावेळी आमदार देवयानी फरांदे चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बोलताना, नाशिकची संस्कृती बिघडविण्याचं काम सुरु असल्याचं फरांदे यांनी म्हटलं आहे. कॅफेच्या माध्यमातून तरुण-तरुणींना गैरप्रकार करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात आहे. नाशिक पोलिसांनी यावर तातडीने काम करायला पाहिजे असे आवाहन फरांदे यांनी केलं आहे.