नाशिक : अनेक अडथळे आणि तांत्रिक त्रुटींमुळे विलंबाने सुरू झालेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीला गुरुवार (दि.१०)पासून सुरुवात झाली. पहिल्या फेरीअखेर नाशिक जिल्ह्यात २८ हजार ११ प्रवेश निश्चित झाले. दुसऱ्या फेरीत विभागात एक लाख ५० हजार ९५६ जागांसाठी विद्यार्थ्यांसाठी प्रक्रियेत भाग घेतील. पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेले तसेच पसंतीचे महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थी या फेरीत प्रवेश घेऊ शकतील. नोंदणीसाठी १३ जुलै ही अंतिम तारीख आहे.
प्रवेशाची पहिली फेरी संपल्यानंतर शिक्षण विभागाने दुसऱ्या फेरीसाठी वेळापत्रक जाहीर केले. पहिल्या फेरीत नाशिक विभागात नोंदणी झालेल्यांपैकी एक लाख ५६ हजार ४९० विद्यार्थ्यांपैकी ६२ हजार ३५ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीअखेर प्रवेश निश्चित केले. ही टक्केवारी ३९.५६ इतकी आहे. नाशिकमधून २८ हजार १४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून, टक्केवारी ३७.९ टक्के इतकी राहिली.
नवीन नोंदणी भाग-१ दुरुस्ती पसंतीक्रम अद्यावत करणे : १० ते १३ जुलै
नियमित फेरीसाठी अलॉटमेंट जाहीर करणे, विद्यार्थी व कॉलेज लॉगिनमध्ये तपशील दर्शवणे कटऑफ यादी प्रसिद्ध करणे: १७ जुलै.
मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चिती करणे : १८ ते २१ जुलै
रिक्त जागा प्रदर्शित करणे : १३ जुलै.
पहिल्या फेरीत विभागात तिन्ही विद्याशांखांचे मिळून ६० हजार ९०९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. अद्यापही विभागात एक लाख ५० हजार ९५६ जागा रिक्त आहेत. १० ते २३ जुलै दरम्यान कॅप प्रवेश प्रक्रियेसह कोटा प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही, विद्यार्थी नोंदणी, भाग-१ दुरुस्ती आणि प्रवेश निश्चिती समांतरपणे सुरू राहील. दुसऱ्या प्रवेश प्रक्रियेत आता पहिल्या फेरीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्याची शक्यता आहे.