11th admission  file photo
नाशिक

Mission Admission | अकरावी प्रवेश; तिसरी यादी आज होणार प्रसिद्ध

अकरावी प्रवेश : १८ हजार ५२२ जागा रिक्त

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महापालिका क्षेत्रात कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येत असलेल्या इयत्ता अकरावी प्रवेशासाठीच्या ऑनलाइन केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये तिसरी यादी आज सोमवारी (दि.२२) प्रसिद्ध होत आहे.

शहरातील ६८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नूतन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या फेरीअखेर नऊ हजार ४७८ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. दुसऱ्या फेरीसाठी चार हजार ७५२ जागा रिक्त होत्या. एकूण रिक्त असलेल्या १७ हजार १२४ जागांसाठी बुधवार (दि. १०) पासून प्रवेशप्रक्रिया सुरू होती. दुसऱ्या फेरीअंती नऊ हजार ४७८ जागांवर प्रवेश निश्चित झाले. त्यात 'कॅप'च्या आठ हजार ४२७ जागा, तर कोटाच्या एक हजार ५१ जागांचा समावेश आहे. तिसरी फेरी यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी एकूण १८ हजार ५५२ जागा रिक्त आहेत. दरम्यान, दि. १८ व १९ जुलै दरम्यान पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. यासह 'कॅप' समितीकडून 'अलॉटमेंट'चे पूर्वपरीक्षणही केले गेले. सोमवारी (दि. २२) प्रक्रियेमधील तिसरी यादी प्रसिद्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT