11th Admission
अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन केंद्रीभूत प्रक्रियेसाठी नोंदणी प्रक्रियेला वेग आला आहे. file photo
नाशिक

Mission Admission | अकरावी प्रवेश : दुसरी 'कट ऑफ' जाहीर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबवण्यात येत असलेल्या इयत्ता अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन केंद्रीभूत प्रक्रियेसाठी नोंदणी प्रक्रियेला वेग आला आहे. दुसऱ्या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांची निवड (कट ऑफ) यादी बुधवारी (दि. १०) प्रसिद्ध करण्यात आली.

शहरातील ६८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या फेरीसाठी 'विज्ञान'चा ९३, 'वाणिज्य'चा ९३, तर कला शाखेसाठी ८८ टक्के 'कट ऑफ' होता. पहिल्या फेरीत सहा हजार ७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. या फेरीसाठी १० हजार ८३१ जागांचे वाटप करण्यात आले हाेते. त्यापैकी चार हजार ७५२ जागा रिक्त राहिल्या. एकूण रिक्त असलेल्या १७ हजार १२४ जागांसाठी बुधवार (दि. १०)पासून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला. याअंतर्गत विद्यार्थ्यांना ३ ते ६ जुलैदरम्यान पसंतीक्रम भरण्याची मुदत देण्यात आली होती. ७ ते ९ जुलै दरम्यान अर्जाची छाननी करुन दुसऱ्या फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, पहिल्या यादीत पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळवूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेशफेरीमध्ये सहभागी होता होणार नाही.

दुसऱ्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि. १२) पर्यंत संंबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. केटीएचएम कॉलेजमध्ये विज्ञान प्रवेशासाठी ओपन (जनरल) श्रेणीत दुसऱ्या 'कट अॉफ' नुसार अनुक्रमे ८८, ८६.६ आणि ७९.६ टक्के असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. गोखले एज्युकेशन संस्थेच्या एचपीटी आर्ट आणि आरवायके सायन्स महाविद्यालयात याच श्रेणीत ९२.४ आणि ८६.० इतकी 'कट अॉफ' जाहीर झाली. केव्हीएन नाईन महाविद्यालयात पहिल्या यादीनुसार ८४.४, ८०.६ इतके टक्के गुण असणाऱ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश मिळणार आहे.

काॅलेजनिहाय कट ऑफ असा..

  • विज्ञान शाखा (सर्व आकडेवारी ओपन कॅटेगिरीसाठी)

  • एचपीटी आर्टस ॲण्ड आरवायके सायन्स कॉलेज : ८६ आणि ८४.४

  • केटीएचएम कॉलेज : ८८, ८६.६ आणि ७९.६

  • केव्हीएन नाईक आर्ट कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज : ८४.४ आणि ८०.६

कला शाखा

  • एचपीटी आर्टस ॲण्ड आरवायके सायन्स कॉलेज : ७७.२

  • केव्हीएन नाईक आर्ट कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज : ७१.२

  • भोसला मिलिटरी कॉलेज : ६३.४

  • एसएमआरके महिला महाविद्यालय : ७०.६

  • केटीएचएम कॉलेज : ७७.४

वाणिज्य शाखा

  • केटीएचएम : ७८.२ आणि ८३ (इंग्रजी माध्यम)

  • केव्हीएन नाईक आर्ट काॅमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज : ६७.४ टक्के

  • बीवायके कॉमर्स : ८८.४ आणि ८५

  • एमएमआरके महिला महाविद्यालय : ७९

SCROLL FOR NEXT