नाशिक

आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म

चौकशी करण्याचे आदेश : मोहनदरी आश्रमशाळेतील घटना

पुढारी वृत्तसेवा

कळवण : तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मोहनदरी शासकीय आश्रमशाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने १५ दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी अभोणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संबंधित विद्यार्थिनीशी संबंध असलेला आरोपीदेखील - अल्पवयीन व तिचाच नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती समोर - आली आहे. त्याला बालन्याय कायद्यानुसार सुधारगृहात पाठविण्यात - आल्याची माहिती आदिवासी विकास - विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा -यांनी दिली आहे.

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत विद्यार्थिनींनी नियमित -आरोग्य तपासणी केली जाते. मात्र, संबंधित विद्यार्थिनी गर्भवती असल्याची बाब प्रसूतीपर्यंत कोणाच्याही निदर्शनास आली नव्हती.

या प्रकरणात वसतिगृह अधीक्षक, मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे. दरम्यान, विद्यार्थिनी आणि आरोपी हे दोघेही कळवण तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते. घटनेची दखल घेत आदिवासी विकास विभागाने चौकशी सुरू केली असून, अहवालानंतर दोषी आढळणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी स्पष्ट केले आहे.

मोहनदरी आश्रमशाळेतील घटना गंभीर आहे. प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आदिवासी विकास विभागाला पत्र दिले आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आश्रमशाळांमधील सुरक्षा, आरोग्य तपासणी आणि देखरेख व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

- आमदार नितीन पवार, कळवण

सदर प्रकार विद्यार्थिनी घरी असताना घडला आहे. आश्रमशाळेत दाखल होताना तिचे फिटनेस व वैद्यकीय प्रमाणपत्र आमच्याकडे आहे. नांदुरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी कशा पद्धतीने केली, याबाबत सांगता येणार नाही. चौकशीसाठी प्रशासनाला सहकार्य करत आहोत.

- अनिल अहिरे, मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा, मोहनदरी

संबंधित विद्यार्थिनी १७ मार्च रोजी आरोग्य तपासणीसाठी आली होती. तपासणीदरम्यान पुढील वैद्यकीय तपासणीची आवश्यकता लक्षात आल्याने तिला नांदुरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला व आवश्यक उपचारासाठी पाठविण्यात आले होते.

- डॉ. जगदीश जाधव, राष्ट्रीय आरोग्य अभियान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT