नाशिक : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकारण (म्हाडा) नाशिक विभागीय कार्यालयात नाशिक शहर व जिल्ह्यातील गाळेधारक, सदनिकाधारक, भुखंडधारकांच्या विविध समस्या, अडचणी सोडविण्यासाठी म्हाडाकडून जनता दरबार आयोजित करण्यता आला आहे.
सोमवारी (दि. 2) रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत हा दरबार भरणार आहे. गडकरी चौक येथील कार्यालयात होणाऱ्या जनता दरबारमध्ये लेखी निवेदन स्विकारले जाणार आहेत.
Comhadansk@gmail.com या मेलवर देखील तक्रारी करता येणार आहेत. सर्व संबधितांनी लाभ घेण्याचे अवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवकुमार आवकळकंठे यांनी केले आहे.