नाशिक : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल)तर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षांचा निकाल सोमवारी (दि.१६) जाहीर झाला. परीक्षेत ३९ विद्यार्थ्यांना १०० परसेंटाईल गुण मिळाले आहेत.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेत नाशिकचे विद्यार्थी चमकले आहेत. निकालात ३९ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले. यामध्ये 'पीसीबी'तील १७ आणि पीसीएम मधील २२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यात ७ लाख २५ हजार ५२ विद्यार्थ्यांनी पीसीबी आणि पीसीएम या ग्रुप साठी परीक्षा दिली होती. परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ७५ हजार ३७७ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले. सीईटी परीक्षेचा निकाल ९३.१५ टक्के इतका लागला आहे. १९ ते २७ एप्रिल या दरम्यान तसेच ५ मे २०२५ या तारखेला एमएचटी-सीईटी-२०२५(पीसीएम ग्रुप) परीक्षा घेण्यात आल्या होत्या. राज्यातील २०७ तर राज्याबाहेरील १७ केंद्रावर एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात आली होती. महाराष्ट्रातून एमएचटी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एकूण ३९ विद्यार्थ्यांना गुण १०० परसेंटाइल गुण मिळाले. पीसीबी ग्रुप मधील १७ विद्यार्थ्यांना तर पीसीएम ग्रुप मधील २२ विद्यार्थ्यांना १०० परसेंटाइल गुण मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.
वेबसाईट डाऊन, सीईटी सेलकडून आवाहन सीईटी सेलची अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात आला. एकाच वेळी अनेकांनी तिच्यावर निकाल पाहण्यासाठी एकच गर्दी केल्याने ती डाऊन झाली. अनेक विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी अडचणी आल्या. त्याच्या तक्रारी आल्यानंतर सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांनी' काही वेळानंतर आपला निकाल विद्यार्थ्यांनी पहावा' अशा प्रकारच्या सूचना देण्याची नामुष्की ओढावली होती.