MGNREGA file photo
रत्नागिरी

MGNREGA | तीन महिन्यांपासूनची मनरेगा मजुरांची मजुरी थकित

थकीत पैसे मिळत नसल्यामुळे मजुरांची पाठ; तब्बल ९ हजार १३३ कामे प्रलंबित

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी- जाकीर हुसेन पिरजादे

ग्रामीण भागातील गरजवंत कुटुंबाला स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही महत्वाकांक्षी योजना राबवली जात आहे. त्यामध्ये जॉबकार्डधारक कुशल व अकुशल व्यक्तीला वर्षभरात किमान शंभर दिवस रोजगार दिल्यामुळे मोठ्चा प्रमाणात मजुरांना हाताला काम मिळत आाहे. दरम्यान, फेब्रुवारी ते एप्रिल अशा तीन महिन्यांची मजुरी मकीत असून त्यामुळे कामाची गती कमी झाली असून मजुरांनी कामाकडे पाठ फिरवली आहे.

३५१ कामांना सुरुवात झाली आहे. तर २०२५-२६ मध्ये ८ हजार २८ अधिक कामे पूर्ण झाली आहेत, मागील तीन वषांतील ते आतापर्यंत तब्बल २ हजार १३३ कामे अपूर्ण असून काही प्रगधीपथावर आहेत. २०२६-२७मध्ये जि. प. मनरेगाच्या ग्रामपंचायतीच्या ३५१ कामांना सुरुवात झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात तालुका, ग्राम स्तरावर मोठबा प्रमाणात रोजगार वॉच हमीची कामे सुरू आहेत, यामध्ये जलसंधारणाची शेततळी, फळबाग लागवड रस्ते, वैयक्तिक लाभाची कामे यासह फळबाग लागवड रस्ते, वैयक्तिक लाभाची कामे यासह इतर कामांचा समावेश आहे. २०२७-२६ मध्ये जलसंधारणाची ३ हजार २१० कामे पूर्ण इझाली, तर रस्त्यांची १४२०, वैयक्तिक लाभाची ८९० आणि इतर ३७२ कामे पूर्ण झाली आहेत. ८ हजार ९८. काने मागील वर्षी पूर्ण झाली आहेत.

रत्नागिरीत एकूण ६ हजार शेततळी पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, रोजगार हमी योजनेतून केंद्राकडून ६० टक्के, तर राज्याकडून ४० टक्के निधी येत असतो. केंद्राकडील निधी आला आहे मात्र राज्य शासनाच्या वतीने अद्याप निधी न आल्यामुळे मागील तीन महिन्यांची मजुरी मजुरांना मिळालेली आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनांच्या कामांना ब्रेक लागला आहे. तसेच वैयक्तिक स्वरूपाची कामे काही अंशी सुरू आहेत.

दरम्यान, २०२२ ते आजतागायत १ हजार १३३ कामे अपूर्ण आहेत. त्यातील मुदतवाढीची २ हजार कामे, फळबाग लागवड, तर उर्वरित ५ हजार ९६० इतर कामे, १२०० कामे ही पूर्ण करायची आहेत.

२०२६-२७साठी जिल्हा परिषदेच्या मनरेगा विभागाच्या वतीने मार्च २०२६ नंतर ३५१ कामांना मंजुरी देण्यात आली असून कामे सुरू आहेत. अशी माहिती उपलब्ध झाली आहे. चिपळूणमध्ये ५४, दापोली ७७, गुहागर १६, खेड ३३, लांजा २४, मंडणगड ३३. राजापूर १३, रत्नागिरी १४, संगमेश्वर ८ असे एकूण ३५१ घरकुलाच्या कामांना मंजुरी मिळाली असून मार्चपासून कामास सुरुवात झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या बतीने देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT