Bristol University Scholarship 
नाशिक

Bristol University Scholarship | मेळघाटातील विद्यार्थी घेणार ब्रिस्टल विद्यापीठात धडे

Bristol University Scholarship | अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील चिखलदरा तालुक्यातील चिल्हाटी या दुर्गम गावातील किशोर बेठेकर या विद्याथ्यनि शिक्षणाच्या बळावर नवा इतिहास रचला.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील चिखलदरा तालुक्यातील चिल्हाटी या दुर्गम गावातील किशोर बेठेकर या विद्याथ्यनि शिक्षणाच्या बळावर नवा इतिहास रचला. कोरकू या विशेष दुर्बल आदिम जमातीतील किशोरने ब्रिटनमधील प्रतिष्ठित ब्रिस्टल विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळवून आपल्या गावासह संपूर्ण समाजाचे नाव उज्ज्वल केले. हे शक्य झाले आहे, आदिवासी विकास विभागाच्या परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेमुळे.

अत्यंत दुर्गम आणि मर्यादित शैक्षणिक सोयीसुविधा असलेल्या भागातून आलेल्या किशोरचा हा प्रवास थक्क करणारा आहे. आदिम जमातीतून परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणारा तो आपल्या गावातील आणि परिसरातील पहिलाच विद्यार्थी ठरला.

किशोरचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, तर पुढील शिक्षण मेळघाटातील आश्रमशाळेत पूर्ण झाले. सन २०२०-२२ या कालावधीमध्ये त्याने मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमधून सामाजिक कार्य विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

आता त्याला ब्रिटनच्या ब्रिस्टल विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे. परदेश शिक्षण शिष्यवृत्तीमुळे त्याच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला असून, शिक्षण शुल्कासह विमान प्रवासाचा खर्च, निवास खर्च आणि इतर शैक्षणिक खर्च शासन उचलणार आहे.

४४,५७८ जीबीपी शिष्यवृत्ती मंजूर

आदिवासी विकास आयुक्तालयाने किशोर बेठेकर याला उच्च शिक्षणासाठी ४४,५७८ पौंड इतकी शिष्यवृत्ती मंजूर केली. यामध्ये २८, २०० पौंड शैक्षणिक शुल्क, १५, २७८ पौंड निर्वाह भत्ता आणि १,१०० पौंड स्टेशनरी व इतर खर्चाचा समावेश आहे.

आदिवासी विकास विभागाच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेमुळे माझे जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होत आहे. ब्रिस्टल विद्यापीठात 'एम.एस्सी.' करण्यासाठी मिळालेली ही संधी माझ्या आयुष्याला नवी दिशा देणारी ठरेल.
- किशोर बेठेकर, लाभार्थी विद्यार्थी
66 आदिवासी विकास विभागाच्या परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागातील विद्यार्थी आता सातासमुद्रापार जाऊन आपले भविष्य उज्ज्वल करत आहेत. किशोर बेठेकरचे यश हे आदिम जमाती समुदायातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. -
लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT