सिडको (नाशिक) : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सोमवार (दि.14) रोजी मुंबई मंत्रालय येथे उद्योगमंत्री समवेत शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून अंबड, सातपूर, आडवन पारदेवी व राजूर बहुला येथील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांतर्फे सोमवार (दि.14) शेतकऱ्यांतर्फे नाशिक ते मंत्रालय संपूर्ण बिऱ्हाडासह काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी (दि.14) सकाळी ५० शेतकऱ्याऱ्यांसह दोन पोलीस अधिकारी बसने मुंबईला बैठकीला जाणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली.
नाशिक ग्रामीणचे पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी समवेत चर्चा केली. मुंबई मंत्रालय येथे सोमवारी (दि.14) उद्योगमंत्री समवेत सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन आहे. त्यामुळे सोमवारी अंबड सातपूर आडवंन पारदेवी व राजूर बहुला येथील शेतकऱ्यांतर्फे नाशिक ते मंत्रालय संपूर्ण बिऱ्हाडासह काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा स्थगित केला असल्याची माहिती प्रकल्पगुस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिली. या बैठकीला साहेबराव दातीर, शांताराम पडोळ, ज्ञानेश्वर कोकणे, नवनाथ कोकणे, राजेंद्र जाधव शिवाजी काळे, डॉक्टर भाऊसाहेब दातीर, बारकु दातीर, नामदेव दातीर, विष्णू दातीर, ज्ञानेश्वर आहेर, त्र्यंबक मोरे, शरद कर्डिले, महेश दातीर उपस्थित होते.