Pudhari
नाशिक

Murder Mystery | हॉटेल मिरचीजवळील अपघात ठरला हत्याकांड; नाशिक पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

Murder Mystery | तो अपघात नव्हे, विवाहितेचा खूनच

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाडीवऱ्हे परिसरातील सांजेगाव शिवारात कारखाली चिरडून झालेल्या ३४ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूला आता वेगळे वळण मिळाले आहे. रूपाली नीलेश पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांच्या तपासात घातपाताचा संशय बळावला असून, पोलिसांनी दीपक शिवाजी सेंदाणे याला ताब्यात घेतले आहे.

चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
रूपाली पाटील या अंबड येथील एकदंतनगर परिसरात कुटुंबासह राहत होत्या. त्या सिडकोतील पवननगर भागातील एका प्रयोगशाळेत नोकरीस होत्या.

नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी नोकरीवर जात असल्याचे सांगून त्या घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या संशयित दीपक सेंदाणे याच्यासोबत एमएच ०३ एआर ५४५२ क्रमांकाच्या कारमधून विल्होळी परिसरात गेल्याची माहिती तपासात समोर आली.

सांजेगाव शिवारातील हॉटेल मिरची परिसरात कार उभी करून दोघे हॉटेलच्या दिशेने जात असताना रूपाली यांना अचानक कारने धडक दिल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. या घटनेत त्या कारच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाल्या.

उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, घटनेची परिस्थिती आणि कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या घातपाताच्या संशयानंतर वाडीवऱ्हे पोलिसांनी तपासाला वेग दिला. वाडीवऱ्हेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज महाजन पुढील तपास करत आहेत.

  1. नाशिकमध्ये भीषण बनाव उघड: विवाहितेचा अपघात नव्हे, कारखाली चिरडून खूनच!

  2. सांजेगाव शिवारातील ३४ वर्षीय रूपाली पाटील मृत्यूप्रकरणात प्रियकर दीपक सेंदाणे ताब्यात.

  3. हॉटेल मिरचीजवळील अपघात ठरला हत्याकांड; नाशिक पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा.

  4. अंबड येथील विवाहितेची कारखाली चिरडून हत्या; वाडीवऱ्हे पोलिसांकडून संशयिताला अटक.

  5. 'एमएच ०३ एआर ५४५२' कारने चिरडले; नाशिकमधील विवाहितेच्या हत्येने खळबळ.

  6. कुटुंबीयांचा घातपाताचा संशय खरा ठरला; नाशिकच्या रूपाली पाटील खून प्रकरणात आरोपीची कबुली.

  7. सिडकोतील प्रयोगशाळा कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; अपघाताचा बनाव रचणारा प्रियकर गजाआड.

  8. वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीत थरार: कारने धडक देऊन विवाहितेचा काढला काटा.

  9. वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या तपासाला यश; अपघाताच्या नावाखाली लपलेला खून उघड.

  10. पुढारी स्पेशल रिपोर्ट: नाशिकमध्ये विवाहितेचा कारखाली चिरडून खून, खुनाचा गुन्हा दाखल.

SEO English Keywords:

  • Wadivarhe Nashik

  • Pudhari

English Hard Slug:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT