Marriage Fraud Nashik 
नाशिक

Marriage Fraud Nashik | लग्नासाठी मुलगी दाखवून गुजरातच्या युवकाची 2 लाख 21 हजारांची फसवणूक; वणी पोलिसांत गुन्हा दाखल

Marriage Fraud Nashik | लग्नासाठी मुलगी दाखवून विवाहाचे आश्वासन देत २ लाख २१ हजार रुपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार दिंडोरी तालुक्यातील खेडगाव शिवारामध्ये उघडकीस आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

वणी : पुढारी वृत्तसेवा
लग्नासाठी मुलगी दाखवून विवाहाचे आश्वासन देत २ लाख २१ हजार रुपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार दिंडोरी तालुक्यातील खेडगाव शिवारामध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुजरात राज्यातील सुरत येथील जगदीशकुमार मथुर्राम गेहलोत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वणी पोलिसांनी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोंडू नंदा साळवे (रा. मखमलाबाद, नाशिक), पूर्ण नाव माहीत नसलेला एक व्यक्ती (रा. मखमलाबाद, नाशिक) आणि निकिता सखाराम गोळे (रा. बुलढाणा) यांनी संगनमत करून फिर्यादीला लग्नासाठी मुलगी दाखवली. विवाहासंदर्भात समजपत्र तयार करून नोटरीची प्रक्रिया केल्यानंतर फिर्यादीकडून गुगल पे आणि रोख स्वरूपात एकूण २ लाख २१ हजार रुपये घेतले.

त्यानंतर लग्न न करताच संबंधित मुलीस वाटेत उतरवून आरोपींनी पोबारा केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गेहलोत यांनी वणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. खेडगाव शिवारातील सीएनजी पंपपुढे सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील परिसर हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT