मनोज जरांगे यांची उद्या नाशिकमध्ये मराठा आरक्षण संवाद रॅली निघणार आहे. Pudhari File Photo
नाशिक

Maratha Reservation : जरांगेंच्या मराठा रॅलीमुळे नाशिकमधील सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

दिनेश चोरगे

नाशिक : मनोज जरांगे-पाटील यांची उद्या नाशिकमध्ये मराठा आरक्षण जनजागृती व महाविराट शांतता रॅली निघणार आहे. यानिमित्त प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी (दि.१३) सुट्टी जाहीर केली आहे. यानिमित्त शिक्षणाधिकाऱ्यांनी प्राचार्यांसह मुख्याध्यापकांना पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

नाशिक शहरात उद्या मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षण जनजागृती व महाविराट शांतता रॅली काढण्यात येणार आहे. यानिमित्त नाशिकमधील मराठा समाज मोठ्या प्रमाणात या शांतता रॅलीत सहभागी होणार आहे. या गर्दीचा विचार करून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये. यासाठी नाशिक शहरातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना उद्या (मंगळवारी) सुट्टी द्यावी,असे आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणधिकारी प्रविण पाटील यांनी पत्रकाद्वारे दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी त्या दिवसाच्या तासिका सुट्टीच्या दिवशी भरून काढाव्यात, असेही शिक्षणधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT