पिंपळनेर : वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र, मुंबई यांच्या वतीने नवनिर्वाचित जनजाती खासदार व आमदारांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बुधवारी (दि.२२) आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनिर्वाचित आदिवासी विभागाचे मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके हे होते. यावेळी आ.मंजुळा गावित यांचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सिंह हे उपस्थित होते. याप्रसंगी विष्णू सुरूम वरिष्ठ बँक अधिकारी, मधुकर गावित , चैत्राम पवार, नीलिमाताई पट्टे, कविता राऊत, सोनूदादा म्हसे, प्रा.डॉ.रामदास आत्राम, नरहरी झिरवाळ, आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेंद्र गावित यांचेसह राज्यातील अनुसुचित मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार व खासदार उपस्थित होते.