Maharashtra Politics Manikrao Kokate
नाशिक : भाजपने विधानसभा निवडणुकीत माझ्या घरातील व्यक्तीला फोडले होते, आता त्यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कुटुंबातील व्यक्तीलाही फोडले आहे. भाजपचे आयुष्य फक्त फोडा फोडीमध्ये चालले आहे. तो पूर्णपणे बाटलेली पक्ष आहे, अशी टीका मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. नाशिक येथील एका जाहीर सभेत ते बोलत होते.
राजकीय स्थितीवर भाष्य करताना कोकाटे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात लढाया फक्त आपसाआपसात म्हणजेच युतीमध्येच जास्त आहेत. विरोधी पक्ष कुठेच दिसत नाही. आपल्याकडे थोडासा उभाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) दिसतो, तोही बाटलेला आहे, आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली बीजेपी आहे. फोडाफोडीमध्ये आयुष्य चाललं आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले आहेत, असे ते म्हणाले.
मंत्री कोकाटे शेतकऱ्यांबद्दल बोलताना म्हणाले की, कृषीमंत्री असताना आणि आजही सांगतो की, शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका, ७० टक्के अनुदानावर योजना द्या. १०० टक्के भांडवली खर्च सरकारने घ्यायला पाहिजे. फुकट काही नको, फुकट दिलं की गोंधळ होतो, फक्त १० ते १५ टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घ्यायची आणि ८५ टक्के रक्कम सरकारने गुंतवायची, यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे कोकाटे म्हणाले.