पुढारी ऑनलाइन डेस्क | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकोटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास व 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. माणिकराव कोकाटे व त्यांच्या भावाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. १९९५ मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपांवरून हा निर्णय देण्यात आला आहे.
1995 ते 97 मध्ये सरकारच्या 10 टक्के कोट्यातून घर घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावावर गुन्हा दाखल होता. दरम्यान या शिक्षेमुळे कोकाटे यांचे कृषिमंत्रीपद गोत्यात येण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या आमदारकीलाही धक्का लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
१९९५ सालचे हे प्रकरण असून माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावर कागदपत्र फेरफार आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणात तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या खटल्याचा निकाल तब्बल २९ वर्षांनी लागला असून, न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावास २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
दरम्यान, कोकाटे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांना या प्रकरणात जामिन मंजुर झाला आहे.
हे तीस वर्षापूर्वीचे प्रकरण आहे. त्यावेळी तुकाराम दिघोळे हे राज्यमंत्री होते. त्यांचे व माझे राजकीय वैर होते. राजकीय सुडापोटी त्यांनी माझ्यावर केस दाखल केली होती. दरम्यानच्या काळात आमचे राजकीय वैर संपुष्टात आले. मात्र, केस सुरु राहिली. आता आपण वरच्या कोर्टात अपिल करण्याचा निर्णय घेतल्याचे माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.