सुरगाणा : सुरगाणा तालुक्यातील मांडवा येथील रहिवासी वसंत तुकाराम जाधव याच्या राहत्या घरी पोलिसांनी छापा टाकून १ लाख ८१ हजार ९०० रुपयांचा गांजाचा साठा जप्त केला. शुक्रवारी (दि.२१) पोलिसांनी ही कारवाई केली.
जाधव याला शनिवारी (दि.२२) दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. सदर कारवाई पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर , उप विभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा पोलीस निरीक्षक राहुल मोरे, बा-हे पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के. डी. शेखरे, कैलास मानकर, दिलीप वाघ, धुम व पोलिस कर्मचारी यांनी केली आहे. याबाबत पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे करीत आहेत.