पुढारी ऑनलाइन डेस्क ; इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारासाठी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचे आयोजन आज (दि. 14) त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आले होते. मात्र, याठिकाणी अचानक आलेल्या वादळामुळे सभा मंडप कोसळल्याची दुर्घटना घटना घडली. परिणामी मंडप कोसळल्याने खरगेंचा ताफा माघारी फिरला.
मोकळ्या मैदानात घेण्यात आलेल्या सभेमुळे अचानक मोठं वादळ आल्याने मंडप उडाला. मंडपाचा काही भाग कोसळला तर काही भाग हा हवेत उडाला. यामध्ये दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मंडप कोसळल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला कारण सभेसाठी बऱ्यापैकी गर्दी झाली होती. लोक मंडपात येऊन बसले होते.
यावेळी येथे मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. कोसळलेला मंडप पुन्हा उभारण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना मात्र मोठी कसरत करावी लागली. दरम्यान खर्गेंच्या ताफ्यालाही माघारी फिरावं लागलं.