नाकाबंदी  Pudhari News Network
नाशिक

Malegaon Bakri Eid | बकरी ईदसाठी 15 ठिकाणी नाकाबंदी

Malegaon Bakri Eid | महानगरपालिकेतर्फे तात्पुरत्या २५ कत्तलखान्यांची उभारणी

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात १५ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक नाकाबंदी ठिकाणी पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे. चोरटी वाहतूक व अवैध कुर्बानीला आळा घालण्यासाठी नाकाबंदी त्याबरोबरच पेट्रोलिंग व बॉर्डर पेट्रोलिंग सुरू आहे. बकरी ईद गुरुवारी (दि. २८) साजरी होणार आहे. ईदला जनावरांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे.

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे. शहरात गोवंश जनावरांची हत्या होऊ नये, यादृष्टीने पोलिसांनी कठोर कारवाया सुरू केल्या आहेत. बकरी ईदसाठी बाहेरहून होणारी जनावरांची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी शहराला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर १५ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

नाकाबंदीस्थळी एक पोलिस कर्मचारी व चार होमगार्ड २४ तास तैनात केले आहेत. नाकाबंदी दरम्यान संशयित वाहनांची तपासणी सुरू आहे. नाकाबंदी असल्याने जनावरांच्या चोरट्या वाहतुकीला आळा बसणार आहे. नाकाबंदी ईदनंतरही काही दिवस कायम ठेवली जाणार आहे. आठवडे बाजारातील जनावरांच्या खरेदी विक्रीवर संबंधित क्षेत्रातील प्रभारी अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कारवाईचा बडगा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल, विविध पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकाऱ्यांनी गुप्त बातमीदारांची माहिती तसेच गोरक्षा समिती कार्यकर्त्यांच्या मदतीने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विविध पोलिस अवैध गोवंश वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात आली आहे. तसेच पोलिसांतर्फे कत्तलखान्यांव्यतिरिक्त होणाऱ्या अवैध कत्तली रोखण्यासाठी यावेळी ड्रोनद्वारे २४ तास नजर ठेवली जाणार आहे.

या ठिकाणी नाकाबंदी

डिडा कॉलनी, दरेगाव, ओवाडी नाला, देवरे वस्ती, खडकी रोड, मनमाड चौफुली, गिरणा पूल, बच्छाव सर्कल, एकात्मता चौक, रामनगर - झोडगे, नरडाणा फाटा-कळवाडी, देवळाफाटा - सौंदाणे, नांदगाव फाटा, करंजगव्हाण - कुसुंबारोड, मालेगाव - नामपूर रोड.

महापालिका प्रशासन सज्ज

महानगरपालिकेने बकरी ईदला होणाऱ्या कुर्बानीसाठी तात्पुरते २५ कत्तलखाने यापूर्वीच केले असून, जागानिश्चिती करीत त्याची माहिती देण्यात आली आहे. त्या पाठोपाठ प्रशासनाने कुर्बानीनंतर होणारी दुर्गंधी, कचरा, अस्वच्छता व साथ रोगांना आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान, प्रशासनाने निश्चित केलेल्या कत्तलखान्यांशिवाय रस्त्यावर, गल्लीबोळात, घरासमोर, गटारीवर किंवा उघड्यावर कुर्बानी केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिस व मनपा प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT