"माझी लाडकी बहीण योजना" लाभार्थींची 'निवड'  Phdhari Photo
नाशिक

Maji Ladki Bahin Yojna | नोंदणीत ‘लाडक्या बहिणीं’ची नाशिक, मालेगावमध्ये आघाडी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महायुतीची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीमध्ये जिल्ह्यात नाशिक तालुक्याने आघाडी घेतली असून, देवळा आणि पेठ तालुक्यांत कमी नोंदणी झाली आहे. या योजनेसाठी राज्यातील पावणेदोन कोटी महिलांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील 7 लाख 37 हजार 467 महिलांचा यामध्ये समावेश आहे. (Nashik taluka leads the district in registration of Chief Minister Ladki Bahin Yojana)

दोन कोटींचा टप्पा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद आहे. लवकरच दोन कोटींचा टप्पा गाठला जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून महिनाभरात 2 कोटी महिलांची नोंदणी होत आहे. राज्य शासनाने तयार केलेल्या नारीशक्ती दूत या अ‍ॅपमुळे अर्ज प्रक्रिया सोपी झाली आहे. या अ‍ॅपमधून दररोज 7 ते 8 लाख अर्ज सादर होत आहेत.

नारीशक्ती दूत अ‍ॅप्लिकेशन देशात 27 व्या क्रमांकावर

जिल्ह्यात नाशिक तालुका आणि मालेगाव या दोन तालुक्यांनी लाखांचा आकडा पार केला आहे. तर इतर तालुक्यांमध्ये तुलनेेने नोंदणी कमी झालेली आहे. योजनेची व्याप्ती लक्षात घेता प्रशासनाने नोंदणीसाठी नारीशक्ती दूत हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. या अ‍ॅप्लिकेशनचे 88 लाख डाउनलोड्स झाले असून, हे अ‍ॅप्लिकेशन देशात 27 व्या क्रमांकावर आहे. सरासरी हे अ‍ॅप्लिकेशन प्रत्येक मिनिटाला 800 नागरिक डाउनलोड करत असल्याचे देखील समोर आले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी

अ‍ॅप बंद; बहिणींचे हाल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना नावनोंदणीसाठी ऑनलाइन अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली सोमवार (दि. 5)पासून तीन दिवस हे अ‍ॅप बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचे हाल होत आहेत. याबाबत जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुनील दुसाने यांच्याशी संपर्क साधला असता, देखभाल, दुरुस्तीसाठी अ‍ॅप बंद आहे. यापुढे ऑनलाइन नावनोंदणी करणार्‍या महिलांचे अर्ज थेट पोर्टलवरतीच अपलोड होतील, अशी माहिती दुसाने यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT