'माझी वसुंधरा' अभियान pudhari file photo
नाशिक

Majhi Vasundhara Abhiyan | 'माझी वसुंधरा'मध्ये राज्यात मोडाळे प्रथम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पंचतत्त्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या 'माझी वसुंधरा ४.०' २०२३-२४ स्पर्धेत नाशिक जिल्हा परिषदेने सर्वाधिक १४ बक्षिसे पटकावत बक्षिसांची लयलूट केली. या अभियानात सलग चौथ्या वर्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय तसेच विभागस्तरीय बक्षिसे मिळविली आहेत.

राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचे एक कोटीचे बक्षीस मोडाळे (ता. इगतपुरी) ग्रामपंचायतीने, तर तृतीय क्रमांकाचे 50 लाखांचे बक्षीस भोकणी (ता. सिन्नर) ग्रामपंचायतीने पटकावले. अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनाही पुरस्कार जाहीर झाला. माझी वसुंधरा अभियान सुरू झाल्यापासून या अभियानात राज्यस्तरीय पुरसकारामध्ये नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक राहिला आहे.

बक्षिसे पुढीलप्रमाणे

सर्वोत्तम कामगिरी राज्यस्तरीय तृतीय बक्षीस : आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

दीड हजार ते अडीच हजार लोकसंख्या गट :

राज्यस्तरावर : मोडाळे ग्रामपंचायत प्रथम, भोकणी ग्रामपंचायत तृतीय

भूमी थिमॅटिक गट

राज्यस्तरीय : मोडाळे ग्रामपंचायत प्रथम क्रमांक

दीड हजारहून कमी लोकसंख्या गट

राज्यस्तर : आवळी दुमाला, दुसरा क्रमांक

भूमी थिमॅटिक गट

राज्यस्तर : आवळी दुमाला ग्रामपंचायत प्रथम क्रमांक

दहा हजारहून अधिक लोकसंख्या गट

राज्यस्तर : पिंपरी सय्यद - पाचवा क्रमांक (उत्तेजनार्थ)

अडीच ते पाच हजार लोकसंख्या गट

राज्यस्तर : ढकांबे ग्रामपंचायत उत्तेजनार्थ

दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गट

राज्यस्तर : पिंपळगाव डुकरा ग्रामपंचायत उत्तेजनार्थ बक्षीस.

विभागस्तरीय बक्षीस : 10 हजारांहून अधिक लोकसंख्या गट : चांदोरी ग्रामपंचायत द्वितीय क्रमांक

पाच हजार ते दहा हजार लोकसंख्या गट : न्यायडोंगरी ग्रामपंचायत तृतीय क्रमांक

दीड हजार ते अडीच हजार लोकसंख्या गट : विभागात दरी ग्रामपंचायत प्रथम क्रमांक, गिलाणे ग्रामपंचायत द्वितीय क्रमांक

दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गट : विभागात : शिरसाठे ग्रामपंचायत द्वितीय क्रमांक

"माझी वसुंधरा अभियानात सलग चौथ्या वर्षी जिल्ह्याला १४ बक्षिसे मिळणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. जिल्हयात पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी व पर्यावरणसमृद्ध गाव करण्यासाठी लोकसहभागातून चांगली कामे करण्यात आली आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामेदेखील करण्यात येत आहेत. यापुढेदेखील माझी वसुंधरा अभियानामध्ये जिल्हयात चांगले काम करून पर्यावरणपूरक गाव तयार करण्यासाठी नियोजन करण्यात येईल.
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.
पुढील वर्षासाठीचेही सूक्ष्म नियोजन करून व मोठ्या प्रमाणात लोकसहभाग घेऊन जास्तीत जास्त ग्राम पंचायतींना पुरस्कार मिळवण्याचे लक्ष्य आहे.
दीपक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT