Simhastha Kumbh Mela Flag Hoisting 
नाशिक

Simhastha Kumbh Mela | आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मुख्य धर्मध्वजासह गंगा-गोदावरी मंदिरावरील ध्वज पारंपरिक सजावटीसह सज्ज

Simhastha Kumbh Mela | सुवर्ण जरी, रेशमी गोंडे, घंटा आणि घुंगरांनी ध्वजांची पारंपरिक सजावट

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी हा ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्य धर्मध्वजासह श्री गंगा-गोदावरी मंदिरावरील ध्वज पारंपरिक पद्धतीने सजवून सज्ज करण्यात आले आहेत, अशी माहिती गंगा गोदावरी पंचकोठी रोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचাক্ষरी यांनी दिली.

मुख्य धर्मध्वजाची वैशिष्ट्ये

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मुख्य धर्मध्वजाची आडवी लांबी १५.५ फूट आणि उभी लांबी ५ फूट आहे. ध्वजाच्या चारही बाजूंना तीन इंच रुंदीची सुवर्ण रंगाची जरीची लेस लावण्यात आली आहे. ध्वजाच्या खालच्या बाजूस १५ घंटा, १२ रेशमी गोंडे आणि ३ घुंगरू बसवण्यात आले असून, यामुळे ध्वजाला पारंपरिक व देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे.

गंगा-गोदावरी मंदिरावरील ध्वज

श्री गंगा-गोदावरी मंदिरावर फडकावला जाणारा ध्वज ९ फूट आडवा आणि ५ फूट उभा आहे. या ध्वजालाही चारही बाजूंनी तीन इंच रुंदीची सुवर्ण रंगाची जरीची लेस लावण्यात आली आहे. तसेच ध्वजाच्या खालच्या बाजूस ९ घंटा, ६ रेशमी गोंडे आणि ३ घुंगरू लावण्यात आले आहेत. दोन्ही ध्वजांच्या प्रमाणबद्ध आकारमानानुसार ही सजावट करण्यात आली आहे. ध्वजांची मापे, रचना व सजावटीबाबत सिंहस्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल, शेखर शुक्ल, प्रतीक शुक्ल, दिलीप शुक्ल आणि ध्वजनिर्माते दुर्गेश खैरनार यांनी ही माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT